गणपती बाप्पा मोरया !

|| वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ||
|| निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ||

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !
युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारातुन हिंदु समाजाला एकजुट करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आली  आणि ह्याच संकल्पनेला अंगीकारत काजुटेकडी घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी स्थानिक तरुण, बाल गोपाळ , जेष्ठ नागरिक व महिलांनी  १९६७ साली  श्री गणरायाची सार्वजनिक प्राणप्रतिष्ठापना केली व यातून नावारूपाला आले ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काजुटेकडी.  १९६७ साली लावलेले हे रोपटे हळू हळू आकार घेऊ लागले.  विभागीय जनतेची अपार श्रद्धा, विश्वास तसेच मंडळाने मोठ्या कष्टाने व मेहनतीने जपलेले पावित्र्य, साधेपणा व पारंपरिक गणेशोत्सव ह्या संकल्पनेला समाजातील सर्व स्थरातील लोकांनी दिलेली दाद हेच ह्या मंडळाचे वैशिष्ट्य, पुढे  सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळ काजूटेकडी येथील श्री गणराया नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध झाला. ५७ वर्ष्यांच्या काळात मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, कला व शैक्षणिक क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी व मंडळाच्या प्रगतीचा चढता आलेख त्यामुळे हे मंडळ घाटकोपर मध्ये विशेष ठरले. लोकांची दिवसेंदिवस वाढत चाललेली श्रद्धा, विश्वास , मंडळाने जपलेली सामाजिक बांधिलकी व साधेपणा यातूनच पुढे 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काजुटेकडी चा श्री गणराया “नवसाला पावणारा काजुटेकडीचा राजा” झाला. 
यंदा मंडळाचे ५८ वे वर्ष, गेली ५७ वर्ष आम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक, देणगीदार, हितचिंतक , जाहिरातदार व विभागीय जनतेचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काजुटेकडी यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद ! ५८ व्या वर्षीच्या भव्य दिव्य सोहळ्याचे आपणा सर्वांना अंत:करण पूर्वक निमंत्रण असेच प्रेम आणि सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहूद्या हीच श्री गणराया चरणी प्रार्थना ! 

।। गणपती बाप्पा मोरया ।। 
।। मंगल मुर्ती मोरया ।।

सन २०१४ पासून मोफत वाय फाय सेवा पुरवणारे मुंबईतील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ !
Visit Us : www.kajutekdicharaja.com